जी.एस.टी. तील च चॅप्टर तीन ते सहा | GST Chapter III to VI

    border

    The following article was published in Maharastra Times on 19.08.2016 under the series “Jodoniya Kar” writen by CA.Dr.Sanjay Burad.The earlier article covered Basics of GST along with Chapter I & II.The Article explains the provisions of GST Model Law in marathi.

    GST MODEL LAW Chapter III to VI

    या उत्तम कायद्याच्या मसुद्यात (Draft Model Law) तिसर्‍या अध्यायात (Chapter) कराच्या लेव्ही व सवलती (Exemption)बाबत कलम ७ ते ११ आहेत. हे किती दर असेल तसेच कोणत्या वस्तु व सेवांवर Reverse Charge Mechanism लागु होईल? हे नंतर  Prescribe केली जाणार आहेत. यात छोट्या कर दात्यांसाठी एक एकीक्रुत योजना (Composition Scheme) दिलेली आहे. यात ५० लाखापर्यंत ज्यांची उलाढाल (Turnover) आहे व जे इतर राज्यात वस्तु व सेवा पुरवणार नाही अश्या करदात्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल. त्यांना वस्तु व सेवा कर गोळा न करता उलाढालीच्या १ टक्का वस्तु व सेवा कर भरता येईल. तसेच त्यांना सेन व्हॅट (Cenvat credit)म्हणजेच Input Tax चा सेट ऑफ घेता येणार नाही. तसेच  करातुन सुट देण्यासाठीच्या सवलती नंतर जाहीर केल्या जातील.         त्यानंतर चौथ्या अध्यायात (Chapter) कर भरण्यासाठी वस्तु व सेवा कधी पुरवठ्याची वेळ व त्याची किंमत (value) काय? याबाबत कलम १२ ते १५ मध्ये माहिती आहे. यात आता वस्तुवर जर आगाऊ रक्कम (Advance) घेतली तर वस्तु व सेवा कर भरावा लागेल. आतापर्यंत अशी तरतुद फक्त सेवा करात होती. ती आता सर्वांना लागु होईल तसेच किंमतीसाठी GST valuation (Determination of the value of supply of goods and Services) Rules, 2016 सुद्धा Draft Model Act मध्ये वेगळे आहेत. ज्यात ८ कलम आहेत त्यात व्याख्या, मूल्यांकनाच्या (Valuation) वेगवेगळ्या पद्धती व Rejection of declared value यांचा समावेश आहे.         वस्तु व सेवा करात Input Tax Credit चा सर्वांना Set off आहे. परंतु यात काही बंधने (Restriction) येणार आहे. जसे व्यवसाया व्यतिरिक्त व्यक्तिगत वापरासाठीच्या वस्तु व सेवा वरील कराचा सेट ऑफ मिळणार नाही तसेच सध्या असलेली काही बंधने पुढे या कायद्यात पण आहे. जसे मोटारवाहनावरील कराचा (प्रवासी वाहतुक करणारे, माल वाहतुक करणारे व वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सोडून) सेट ऑफ मिळणार नाही. सध्या कर्मचाऱ्यासाठी  केलेल्या व कर्मचाऱ्याच्या व्यक्तिगत वापराचा काही खर्चावरील कराचा सेट ऑफ मिळत नाही तो नवीन कर कायद्यात तसाच ठेवला आहे.उदा. कर्मचाऱ्याच्या LTA खर्चावरील कर, त्यांचा विमा मालकाने काढला त्या खर्चावरील कर, त्यांच्या क्लब (club) सदस्य फी वरील कर इ. भांडवली वस्तुंवर जर घसारा (Depreciation) वजावट घेतली असेल तर तो कर पुन्हा Set Off घेता येणार नाही. थोडक्यात अप्रत्यक्ष कर व आयकर या दोन्हींमध्ये फायदा घेता येणार नाही. याव्यतिरिक्तही अजुनही काही बंधने आहेत.        Input set off घेण्यासाठी काही बंधने आहेत. जसे करदात्याकडे कराचे बिल किंवा इतर कागदपत्रे पाहिजेत, त्याने वस्तु व सेवा घेतली पाहिजे. ज्या कराचा करदाता Set Off घेत आहे तो सरकारकडे जमा झालेला पाहिजे व त्याने कर विवरणपत्र भरलेले पाहिजे. जेथे करदाता जॉबवर्करकडून जॉब करून घेणार आहे. तेथे सध्याची असलेली अट १८० दिवसात वस्तु जॉबवर्करकडून परत आली पाहिजे तरच त्या वस्तुवरील Input कर करदात्यास घेता येतो.  नवीन कायद्यातही तशीच तजवीज ठेवण्यात आली आहे.         सेवाकरात सध्या Input service Distributor (ISD) ही संकल्पना आहे. यात करदाता आपल्या मुख्य कार्यालयात त्याला मिळणाऱ्या सर्व सेवांवरील कर (ज्यांचे बिल व खर्च मुख्य कार्यालयातुन होतात – आपल्या वेगवेगळ्या विभागांना (Units) ISD ची मुख्य कार्यालयात नोंदणी घेवुन तो सेवा कर वर्ग (Transfer)करू शकतो. ही संकल्पना नवीन GST कायद्यात ही  दिलेली आहे. याची व्याप्ती वाढवुन ती राज्य वस्तु व सेवा कर कायद्यात समाविष्ट केलेली आहे. मुख्य कार्यालयात ISD अंतर्गत जमा होणाऱ्या कराचे वितरण करण्याबाबत कलम १८ मध्ये तरतुद आहे.

    वस्तु व सेवा करात नोंदणीबाबत सहाव्या अध्याया (Chapter) त कलम १९ ते २२ मध्ये सर्व माहिती आहे. यात नवीन नोंदणी, तात्पुरत्या करदात्यासाठीच्या तरतुदी (Provisions), नोंदणीतील बदल व नोंदणी रद्द कशी करतायेईल याबाबत माहिती आहे. यात करदात्यास ज्या राज्यात तो व्यवसाय करणार आहे त्या प्रत्येक राज्यात नोंदणी करावी लागेल. अर्थात करदाता एका राज्यातुन दुसऱ्या राज्यात वस्तु पाठवत असेल वा सेवा देत असेल तर त्याला ज्या राज्यात त्यांचे ऑफीस आहे (दुसरीकडे ब्रांच नसेल तर) त्या राज्यात एकच नोंदणी करावी लागेल. एका करदात्यास कार्यक्षेत्राप्रमाणे (verticals) वेगवेगळे नोंदणी क्रमांक घेता येतील.

    Note:There have been changes in Model Law since the date this article was published.

    print

    Aug 19, 2016 - GST Model Law (Marathi) - Sanjay Burad



    Comments are closed.

    Archives
    error: Content is protected !!