जीएसटी : कर, सूट आणि वस्तू

  border

  The following article was published in Maharashtra Times  under the series ” Jodoniya Kar”. The series is penned by CA. Dr. Sanjay Burad.

  GST त नवीन करदात्याला क्रेडीट मिळणे बाबत :

  कलम १४५ अनुसार GST त नोंदणीकृत करपात्र व्यक्ती आधीच्या कायद्यात नोंदणीकृत नसेल किंवा सूट असलेल्या (exempt) वस्तु निर्मिती करत असेल परंतु तो या कायद्यात कर भरण्यास जबाबदार आहे (ती वस्तु करपात्र झाली / त्याला असलेले SSI Limit बदल्यामुळे करभरण्यास पात्र झाला इ.) तर अशी व्यक्ती GST लागु झालेल्या दिवशी त्यांच्याकडे साठवुन ठेवलेल्या वस्तुवरील किंवा अर्धवट तयार (Semi-Finished) वस्तु मध्ये असलेल्या इनपुट वरील किंवा तयार झालेल्या वस्तु मधील इनपुट वरील क्रेडीट त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मध्ये घेवू शकतो. यात काही अटी टाकण्यात आल्या आहे. त्या पुढील प्रमाणे…

  1. ज्यावर क्रेडीट घेतले आहे असे इनपुट, वस्तु ह्या करपात्र पुरवठ्यामध्ये किंवा त्यासाठी ह्या कायद्याप्रमाणे वापरल्या पाहिजे.
  2. अधिच्या कायद्यात असे क्रेडीट घेण्यास पात्र होते परंतु तो करदाता नोंदणीकृत नव्हता किंवा जी वस्तु बनविली त्यावर करातुन सुट घेता येत होती. त्यामुळे तो क्रेडीट घेवु शकला नाही.
  3. तो ह्या कायद्यात इनपुट टॅक्स क्रेडीट घेण्यास पात्र पाहिजे.
  4. असे क्रेडीट त्या व्यक्तीकडे इनपुट क्रेडीट घेण्यासबंधीचे बील किंवा इतर नमुद केलेली कागदपत्र हवीत ज्यावर कर दिल्याचे सिद्ध होईल.
  5. असे बील GST लागु झालेल्या तारखेपासुन १२ महिन्यापेक्षा जास्त आधीचे नको. उपकलम ३ प्रमाणे क्रेडिटची रक्कम सर्वसाधारणपाने स्वीकारलेल्या लेखा तत्वानुसार (Generally Accepted Standerds) नमुद (prescribed) पद्धतीप्रमाणे असेल. यात “पात्र कराची” व्याख्या दिली आहे. अशा प्रकारची तरतुद स्टॅाक मधील वस्तु इनपुट साठी SGST मध्ये वस्तु व सेवा पूरवठ्या संदर्भात आहे.

  कलम १४६ मध्ये Composition Scheme मधून नेहमीच्या पद्धतीत जाणाऱ्या करपात्र व्यक्तीसाठी मिळु शकणाऱ्या इनपुट कराबाबत आहे. त्याचप्रमणे कलम १४७ मध्ये नेहमीच्या पद्धतीतून composite Scheme मध्ये जाणत्या करपात्र व्यक्तीस GST लागु असलेल्या दिवशी असलेल्या स्टॅाक मधील इनपुट वरील क्रेडीट त्याच्या इनपुट रोख रजिस्टर मध्ये डेबिट करावे लागेल याबाबत आहे.

  करातुन सूट असलेल्या वस्तु GST लावुन नंतर परतीबाबत :

  कलम १४८ प्रमाणे GST लागु झालेल्या दिवसा आधी ६ महिन्याच्या आतील ज्या करातुन सूट असलेल्या वस्तु GST मध्ये त्यांना कर लागुझाल्यावर ही परत केल्या तर त्यांना कर लागणार नाही मात्र अशा प्रकारच्या वस्तु त्याच असल्याची खात्री ऑफीसरला करून देण्याची जबाबदारी करपात्र व्यक्तीची असेल.

  तसेच कलम १४९ मध्ये GST लागुहोण्या आधीच्या करपात्र वस्तुंना GST त सूट मिळाली व त्या लागु झालेल्या दिवसाआधी सहा महिन्यांच्या आतील असतील तर करधाराकास त्यावरील भरलेल्या कराचे क्रेडीट घेता येईल. अशा प्रकारची तरतुद CGST व SGST दोघांमध्ये आहे.

  कलम १५० मध्ये GST लागु झाल्यापासुन किंवा नंतर जॉब वर्करकडून सहा महिन्यांपर्यंत घेतले / रिमुव्ह केले असेल तर त्यावर कर भरावा लागणार नाही. मात्र यावर योग्य ते कारण दाखवुन अजुन दोने / सहा महिन्यापर्यंतची मुदत अजुन दोन महिने वाढवून घेता येईल. अशाप्रकारची सूट घेण्यासाठी उत्पादक व जॉब वर्कर्स दोघांनी त्यांच्या जाहीर केलेल्या स्टॅाक मध्ये अशा इनपुटचा समावेश असला पाहिजे. तर अशाप्रकारची तरतुद अर्धवट तयार असलेल्या वस्तुंसाठी कलम १५१ मध्ये आहे, तयार वस्तु बाबत कलम १५२ मध्ये तरतूद आहे.

   

  करामध्ये किमतीबाबत बदल झाल्यास :

  कलम १५३ प्रमाणे जर GST लागु झाल्यानंतर आधीच्या कराप्रमाणे वस्तु वा सेवा किंवा त्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली तर एक पुरक (Supplymentary) बील / डेबिट नोट ३० दिवसाच्या आत द्यावे लागेल हे GST मध्ये पुरवठ्याबाबतचे बील म्हणुन पकडले जाईल. अशा पुरक बिलात किंवा डेबिट नोटमध्ये काय माहिती द्यावी लागेल याबाबत सरकार नमुद (prescribe) करेल.

  आधीच्या कायद्यातील बाकी (Pending) परताव्याबाबत:

  कलम १५४ प्रमाणे आधीच्या कायद्यातील बाकी असलेल्या परताव्याबाबत आधीच्या कायद्याप्रमाणे नियम लागु होतील (GST त ही) मात्र असे क्लेम पूर्ण किंवा काही रक्कम नाकारली (Reject) तर ती रद्द (lapse) होईल.

   

  सेन व्हॅट क्रेडीट बाबत :

  कलम १५५ प्रमाणे आधीच्या कायद्यातील सेन व्हॅट क्रेडीट बाबतचे अपीलमध्ये, रिव्हिजनमध्ये किंवा रिव्हु (Review) रेफरन्स बाबत आधीच्या कायद्यानुसार निर्णय लावुन त्यास क्रेडीटची रक्कम पात्र झाल्यास ती परत करण्यात येईल. ती इनपुट क्रेडीट मध्ये स्वीकार्य (admissible) राहणार नाही. तसेच जर असा क्लेम रद्द (Reject) झाला व ती कराची बाकी (Arrear) म्हणुन वसूल करण्यात येईल व ती रक्कम इनपुट टॅक्स क्रेडीट मध्ये समाविष्ट असणार नाही.

   

  कराच्या देयतेबाबत :

  कलम १५६ प्रमाणे GST लागु होण्या आधीच्या अपिल, रिव्हिजन, रिव्हीव व रेफरन्स जे आधीच्या कायद्याअंतर्गत आहेत, अशा स्थितीत त्याच्या निर्णयानंतर जर कर वासुलीसपात्र (Recoverabale) झालातर ती रक्कम इनपुट क्रेडीटला पात्र नसेल.

  प्रोसिडिंग प्रमाणे कराची वसुली व इनपुट क्रेडीट बाबत :

  कलम १५७ प्रमाणे आधीच्या कायद्याअंतर्गत GST लागु झाल्याच्या दिवशी किंवा नंतर प्रोसिडिंग चालु झाले असेल व त्याचा निर्णय होउन कर, दंड, व्याज करधारकाकडून वसुलीस (Rcoverable) पात्र असेल. व ती कर बाकी GST कायद्याप्रमाणे वसूल केले जाईल व ते इनपुट क्रेडीट म्हणुन पात्र नसेल.

  तसेच आधीच्या कायद्यामध्ये निर्णय झालेल्या कराची वसुली या GST कायद्याप्रमाणे वसूल झाले तर ती रक्कम इनपुट क्रेडीट म्हणुन पात्र नसेल.

  print

  Nov 16, 2016 - GST Model Law (Marathi) - Sanjay Burad  Comments are closed.

  Archives
  error: Content is protected !!