इ वे बिल | E-Way Bill

    border

    पुढील लेख हा सीए. डॉ. संजय बुरड यांनी लिहिलेला असुन, हा लेख ०१ फेब्रुवारी २०१८ रोजी महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

     

    जी.एस.टी. मध्ये इ वे बिल (Electronic Way Bill) साठी सरकारने १६ जानेवारी पासून सुविधा उपलब्ध केली आहे. हे इ वे बिल (E-Way Bill) १ फेब्रुवारी पासुन आंतरराज्यीय वाहतुकीसाठी बंधनकारक केले आहे. तसेच १५ राज्यांमध्येसुद्धा राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी इ वे बिल (E-Way Bill) १ फेब्रुवारी पासुन बंधनकारक होणार आहे. इतर राज्यांतर्गत वाहतुकीसाठी सुद्धा १ जुन पासुन इ वे बिल बंधनकारक राहणार आहे.

    जीएसटीत इ वे बिल (E-Way Bill) हे जीएसटी पोर्टल वरून माल वाहतुकीसाठी तयार (Generate) केलेला दस्तऐवज आहे.  जीएसटीमध्ये नोंदणीकृत व्यक्तीला ५०,००० (पन्नास हजार) रुपयापेक्षा जास्त किंमतीच्या वस्तुंची वाहतूक इ वे बिल (E-Way Bill) शिवाय करता येणार नाही. (इ वे बिल (E-Way Bill) हे मोबाईलवरून SMS द्वारे तयार किंवा रद्द करता येणार आहे.)

    • इ वे बिल (E-Way Bill) केव्हा आवश्यक?
    • ५०,००० पेक्षा जास्त किंमतीच्या वस्तुंचा पुरवठा करतांना किंवा
    • पुरवठ्या व्यतिरीक्त पाठवतांना (यात किंतीनीचे भुगतान नसेल) किंवा
    • अनोंदणीकृत व्यक्ती (Unregister Person) कडून वस्तु खरेदी करत असाल तर, इ वे बिल (E-Way Bill) आवश्यक आहे.
    • इ वे बिल (E-Way Bill) केव्हा आवश्यक नाही?

    खालील व्यव्हारांमध्ये इ वे बिल (E-Way Bill) आवश्यक नाही.

    • जर वस्तुंची गैर मोटर वाहनांतून (Non Motorised Vehicle) वाहतुक केली असेल तर
    • वस्तु विमानतळ (Air Cargo) किंवा Custom Land Station बंदरावरून, आय.डी.सी. (Inland Container Depot) किंवा सी.एफ.एस. (Container Freight Station) मध्ये वाहतुक करतांना.
    • काही विशिष्ट वस्तु की ज्या सरकारने निर्देशित केल्या असतील त्याचीवाहतूक करतानां. यात सरकारने १५४ वस्तुंची यादी प्रसिद्ध केली आहे, यात प्रामुख्याने खाद्यपदार्थांचा समावेश आहे, त्याच बरोबर इतर वस्तुंचाही समावेश त्यात आहे.
    • इ वे बिल (E-Way Bill) हे पुढील बाबींसाठी तयार (Issue) करायचे आहे.
    • वस्तुंचा पुरवठा किमंत घेऊन व्यवसायासाठी किंवा व्यवसाया व्यतिरीक्त करतांना,
    • वस्तु आपल्या इतर शाखेत पाठवतानां (यात किंमतीचे भुगतान नसेल)
    • वस्तुंचे विनिमय (Barter Exchange) करतांना
    • इ वे बिल (E-Way Bill) कसे बनवावे ?

    इ वे बिल (E-Way Bill) हे ewaybill.nic.in या वेबसाईटवरून बनवायचे आहे. यासठी तिथे प्रथम नोदनी करावी लागेल व तेथूनच इ वे बिल (E-Way Bill) हे तयार (Generate) करता येतील.

    इ वे बिल (E-Way Bill) बनविण्यासाठी लागणारी माहिती

    • इ वे बिल (E-Way Bill) तयार (Generate) करण्यासाठी ज्या वस्तुंची वाहतूक करायची त्याचे बील / वस्तुंचा पुरवठा बिल / करपात्र बिल लागेल.
    • वाहतूक ज्या वाहनातुन होईल त्या वाहनाचा नोंदणीकृत क्रमांक किंवा वाहतुकदाराचे ओळखपत्र.
    • जर वाहतूक रेल्वेने, विमानाने किंवा जहाजाने होणार असेल तर वाहतुकदाराचे ओळखपत्र, वाहतूक कागदपत्रांचा क्रमांक व तारीख
    • इ वे बिलाची (E-Way Bill) मुदत.

    इ वे बिल (E-Way Bill) जनरेट केल्यावर त्याची मुदत खालीलप्रमाणे असेल

    अनु.क्रं. वाहतुकीचे अंतर मुदत
    १०० किमीपर्यंत १ दिवस
     

    पुढील प्रत्येक १०० किमीपर्यंत किंवा त्याच्या भागास

     

    १ अतिरिक्त दिवस

     

     

     

     

     

     

     

     

    ही मुदत काही वस्तूंसाठी कमिशनर (Commissioner) नोटिफिकेशन काढून वाढवु शकेल.

    जर इ वे बिल (E-Way Bill) रद्द करायचे असेल तर ते जनरेट केल्यापासुन २४ तासांच्याआत रद्द करता येईल. तसेच ज्याला वस्तु प्राप्त झाल्याची स्वीकृती ही वेबसाईटवर किंवा SMS द्वारे द्यायची आहे. जर ही स्वीकृती ७२ तासांच्या आत दिलीनाही तर वस्तु प्राप्त झाली आहे असे समजले जाईल.

    • इ वे बिल (E-Way Bill) कसे जनरेट करायचे?

    व्यक्तीला सरकारच्या http://ewaybill.nic.in या कॉमन पोर्टलवर प्रथम नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी एकदाच करावी लागेल. त्यानंतर वस्तु पाठविताना इ वे बिल (E-Way Bill)  कॉमन पोर्टल वर GST EWB -01 फॉर्मच्या A विभागात माहिती भरून तयार (Issue) करायचे आहे. त्यानंतर वाहतूक करणाऱ्यास वस्तु / माल दिल्यावर त्याची माहिती ही EWB -01  च्या B विभागात भरायची आहे.

    जर वाहतुकदार एकाच वाहनामध्ये अनेक वस्तुंची वाहतूक करत असेल तर त्यास  GST EWB -02 हे एकत्रित (Consolidated) इ वे बिल बनवावे लागेल ज्यात सर्व बिलांची माहित असेल.

    तसेच  वाहनची तपासणी जीएसटी अधिकाऱ्याने केली तर तो कॉमन पोर्टलवर GST EWB -०३ हा फॉर्म उपलोड करेल. जर वाहन त्याने ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ ताब्यात ठेवले (Detain) / थांबविले असेल तर त्याची माहिती तो GST EWB -०४ मध्ये कॉमन पोर्टल वर देईल.

    अशाप्रकारे कर चुकवेगिरी करणा-यांवर बंधण आणण्यासाठी इ वे बिल (E-Way Bill) एक चांगले साधन ठरणार आहे. कारण सरकारकडे इ वे बिल (E-Way Bill) कॉमन पोर्टलवर वस्तु वाहतुकीच्या सर्व नोंदी (Record) तयार होणार आहे.

    (लेखक जी.एस.टी. क्षेत्रातील तज्ञ आहेत.)

    Note : English Version to be uploaded soon

    Feb 01, 2018 - GST (Marathi) - Team SSB



    Comments are closed.

    Archives
    error: Content is protected !!