जी एस टी विवरणपत्र – ३बी मधील चुकांच्या दुरुस्तीबाबत खुलासा | How to rectify mistakes in GSTR 3B?

    border

     

    पुढील लेख हा सीए. डॉ. संजय बुरड यांनी लिहिलेला असुन, हा लेख २० जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

    वस्तु व सेवा कर १ जुलै २०१७ पासुन लागु झाल्यानंतर कायम प्रकाश झोकात राहिला आहे. करदात्यांना महिन्याला जी.एस.टी.आर-१, जी.एस.टी.आर-२  व जी.एस.टी.आर-३ असे तीन विवरणपत्र भरावयाचे होते. नंतर जी.एस.टी. नेटवर्कच्या तांत्रिक  अडचणीमुळे जी.एस.टी.आर-३बी (GSTR-3B) विवरणपत्र करदात्यांना सरकारने भरावयास सांगितले आहे. त्या मध्ये करदात्यांची महिन्याची खरेदी विक्रीची संक्षिप्त माहिती व कर रक्कम नमुद करून, कर भरावयाचा आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये करदात्यांची उलाढालीप्रमाणे दोन विभाग केले, ज्यांची वार्षिक उलाढाल १.५० कोटीपेक्षा कमी आहे, त्यांना आता कंपोझीशान स्कीम प्रमाणे तिमाही विवरणपत्र भरावयाचे आहे व बाकी सर्वांना मासिक विवरणपत्र भरावयाचे आहे. नवीन प्रणालीमुळे हे विवरणपत्र भरतांना ३बी विवरणपत्रात चुका होणे स्वाभाविक आहे, याबाबत सरकारने एक परिपत्रक (CIRCULAR) २९ डिसेंबरला काढलेले आहे. त्याबाबत आपण माहिती घेवु.

    • ३बी विवरणपत्रात (GSTR-3B) कराची रक्कम कमी दाखवली गेली (Liability was under Reported) :

    ज्या करदात्यांनी कराची रक्कम व इनपुट टॅक्स क्रेडीट घेवुन सादर केले म्हणजेच ३बी विवरणपत्र  सदर (Submit) केले परंतु अंतिम सादरीकरण (Filed) केले नाही. तसेच कॅश लेजर मध्ये कराची भरलेली रक्कम दाखविली व नंतर कराची देयता सेटऑफ (Set Off) केली नाही. असे करदाते विवरणपत्र सुधारण्याची सुविधा (Return Edit Facility) वापरून कराची योग्य रक्कम दाखवू शकतात. परंतु ज्यांनी कराची देयता सेटऑफ (Set Off) केली व ३बी विवरणपत्र सादर (Filed) केले आहे त्यांनी आपल्या पुढील महिन्याच्या ३बी विवरणपत्रात ही कराची (Tax Liability) रक्कम दाखवावी मात्र यावर करदात्याला व्याज भरावे लागेल तसेच जी.एस.टी.आर-१ विवरणपत्रामध्ये टेबल-९ मधून अशी कराची देयता (Tax Liability) दुरुस्त करावी लागेल.

    • ३बी विवरणपत्रात (GSTR-3B) कराची रक्कम जास्त दाखविलीगेली :

    ज्या करदात्यांनी कराची रक्कम व इतर माहिती भरून विवरणपत्र सादर (Submit) केले परंतु अंतिम सादरीकरण (Filed) केले नाही ते विवरणपत्र सुधारण्याच्या सुविधेचा (Return Edit Facility) वापर करून दुरुस्ती करू शकतात. परंतु ज्यांनी कराची देयता (Tax Liability) सेटऑफ (Set off) केली म्हणजे कॅश लेजर व क्रेडीट लेजर यामधुन सर्व देयता (Liability) डेबिट (Debit) केली असेल, तसेच विवरणपत्र सादर (Filed) केले असेल अश्या करदात्यांना कराची दुरुस्ती पुढील विवरणपत्रात करावयाची आहे. जेथे जास्त कराची रक्कम समायोजीत (Adjustment) करता येणे शक्य नसेल त्यांनी कराच्या परताव्यासाठी अर्ज (Tax Refund application) करावयाचा आहे.

    उदा. अ.ब.क. व्यापाऱ्याने एक आंतरराज्यीय विक्री (Inter State) चुकून दोनदा दाखवून आय.जी.एस.टी. (IGST) दुप्पट भरलातर पुढील महिन्याच्या ३बी विवरणपत्रात दुरुस्ती करून आय.जी.एस.टी. कराची देयता (Tax Liability) कमी दाखवायची व पुढे कराची देयता समायोजित (Adjust) करावयाची आहे, जर हे समायोजित (Adjustment) करणे शक्य नसेल तर अ.ब.क. व्यापाऱ्याला कर परतावा घेण्यासाठी अर्ज करावा लागेल. तसेच ही दुरुस्ती जी.एस.टी.आर-१ मध्ये टेबल-९ मार्फत करावयाची आहे.

    • ३बी विवरणपत्रात (GSTR-3B) इनपुट टॅक्स क्रेडीट कमी दाखविले गेले :

    जी.एस.टी.आर-३बी विवरणपत्रात जर इनपुट टॅक्स क्रेडीट कमी दाखविले गेले असेल व विवरणपत्र व कॅश लेजर मध्ये माहिती दाखवली गेली असेल परंतु विवरणपत्र सादर (Filed) केलेले नसेल फक्त (Submit) केलेले असेल व कॅश लेजर मध्ये कराचा भरण्याबाबत माहिती टाकलेली असेल व करांची देयता (Liability) ऑफसेट (Off set) केलेली नसेल तर विवरणपत्र सुधारण्याच्या सुविधेचा (Edit Facility) वापर करून दुरुस्ती करावयाची आहे. मात्र कराची देयता (Liability) ऑफसेट केली असेल व विवरणपत्र सादर (Filed) केले असेल तर इनपुट टॅक्स क्रेडीट जे घेतले नसेल ते पुढील विवरणपत्रात दाखवायचे आहे. जी.एस.टी.आर-१ मध्ये याबाबत काहीच दुरुस्ती करावी लागणार नाही.

    • ३बी विवरणपत्रात (GSTR-3B) इनपुट टॅक्स क्रेडीट ज्यास्त घेतले गेले असेल तर :

    जी.एस.टी.आर-३बी विवरणपत्रात जर इनपुट टॅक्स क्रेडीट जास्त घेतले गेले असेल व विवरणपत्र दाखल (Filed) केले नसेल फक्त सबमिट (Submit) केलेले असेल व कॅश लेजर मध्ये टॅक्स देयता (Liability) ऑफसेट (Off set) केलेली नसेल तर विवरणपत्र सुधारण्याच्या सुविधेचा (Edit Facility) वापर करून ३बी विवरणपत्र दुरुस्त करता येईल मात्र ज्या करदात्याने ३बी विवरणपत्र सादर (Filed) केले असेल, कराची देयता (Liability) ऑफसेट (Off set) केली असेल तर त्यास त्यानंतरच्या (subsequent) महिन्याच्या ३बी विवरणपत्रात जास्त घेतलेले इनपुट टॅक्स क्रेडीट हे रिव्हर्स (Reverse) करावे लागेल यात करदात्यास व्याज सुद्धा भरावे लागेल. जी.एस.टी.आर-१ मध्ये याबाबत काहीच दुरुस्ती नसेल.

     

    • विवरणपत्राचे वेळापत्रक (Due Dates) :

    जी.एस.टी.आर-३बी व जी.एस.टी.आर-१ च्या देय तारीख (due dates) पुढीलप्रमाणे

    अनु.क्र. करदाता विवरणपत्र महिना मुदत
    सर्वांसाठी जी.एस.टी.आर-३बी डिसेंबर २०१७

    जानेवारी २०१८

    फेब्रुवारी २०१८

    मार्च २०१८

    एप्रिल २०१८

    २० जानेवारी २०१८

    २० फेब्रुवारी २०१८

    २० मार्च २०१८

    २० एप्रिल २०१८

    १० मे २०१८

    १.५० कोटी पर्यंत उलाढाल जी.एस.टी.आर-१

    (तिमाही विवरणपत्र)

    जुलै-सप्टेंबर २०१७

    ऑक्टोबर-डिसेंबर २०१७

    जानेवारी-मार्च २०१८

    १० जानेवारी २०१८

    १५ फेब्रुवारी २०१८

    ३० एप्रिल

    १.५० कोटी वरील उलाढाल जी.एस.टी.आर-१

    (मासिक विवरणपत्र)

    जुलै-नोव्हेंबर २०१७

    डिसेंबर २०१७

    जानेवारी २०१८

    फेब्रुवारी २०१८

    मार्च २०१८

    १० जानेवारी २०१८

    १० फेब्रुवारी २०१८

    १० मार्च २०१८

    १० एप्रिल २०१८

    १० मे २०१८

     

    • विवरणपत्र वेळेत भरले नाही तर भरावा लागणारा दंड (Late Fee) :
    • ३बी विवरणपत्रासाठी –

    सरकाने ३बी विवरणपत्र वेळेत भरले नाही तर ३बी विवरणपत्राची लेट फी कमी केलेली आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चे ३बी विवरणपत्राची लेट फी रद्द केली आहे व ऑक्टोबर २०१७ नंतर ज्यांचे विवरणपत्र कराची देयता (Liability) त्या महिन्याची निरंक (Nil) असेल त्यांना २० रू प्रतिदिवस (१० रू सी.जी.एस.टी. व १० रू एस.जी.एस.टी.) दंड भरावा लागेल. इतरांसाठी हा दंड ५० रू प्रतिदिवस (२५ रू सी.जी.एस.टी. व २५ रू एस.जी.एस.टी.) लेट फी भरावी लागेल.

    • जी.एस.टी.आर.-१ विवरणपत्रासाठी भरावा लागणार दंड –

    जी.एस.टी.आर.-१ साठी लेट फी ही २००/- प्रतिदिवस (१०० रू सी.जी.एस.टी. व १०० रू एस.जी.एस.टी.) भरावी लागणार आहे. त्यासाठी करदात्यांना जी.एस.टी.आर.-१ वेळेत भरण्याची काळजी घ्यावी लागेल.

    (लेखक जी.एस.टी. क्षेत्रातील तज्ञ आहेत.)

    print

    Jan 20, 2018 - GST (Marathi) - Sanjay Burad



    Comments are closed.

    Archives
    error: Content is protected !!